Yei Oh Vitthale Aarati Lyrics in Marathi
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहें ॥ ध्रु० ॥
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
आलिया गेलिया हातीं धाडी निरोप ।
पंढरपुरीं आहे माझा मायबाप ॥ येई० ॥ १ ॥
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
पिवळा पीतांबर कैसा गगनीं झळकला ।
गरुडावरि बैसोनि माझा कैवारी आला ॥ येई० ॥ २ ॥
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी ।
विष्णुदास नामा जीवें भावें ओंवाळी ॥ येई हो० ॥ ३ ॥
Read More:
- पुत्रदा एकादशी व्रत कथा
- सफला एकादशी व्रत कथा
- हरिपाठ – संत ज्ञानेश्वर माउलींचा हरिपाठ
- श्री विठ्ठल आरती : युगे अठ्ठावीस विटेवरी
Watch Video:
Yei Oh Vitthale Aarati by Rajshri Soul