Top 5 shani mandir in india:भारतातील काही प्रसिद्ध शनि मंदिरे

Blog

शनिदेव हे सूर्यपुत्र आहेत. शनि देवाला भगवान शिव आणि हनुमान जी चे भक्त मानले जातात. असे म्हणतात की शनिदेव व्यक्तीच्या कर्मानुसार शुभ आणि अशुभ फळ देतो. शनिदेवाचा आशीर्वाद मिळविण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सत्य आणि प्रामाणिकपणाने काम करणे. सामान्यता लोकांमध्ये शनिदेव किंवा शनी ग्रह यांच्या बद्दल अनेक गैरसमज आहेत. काही लोक त्यांना अशुभ आणि दुःखदायक ग्रह म्हणून मानतात. पण प्रत्यक्षात शनिदेव हे न्यायप्रिय असून ते मोक्ष प्रदान करणारे एकमेव ग्रह मानले जातात. शनिदेव हे निसर्गात संतुलन राखणाऱ्या आणि प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कर्माचे योग्य फळ देणाऱ्या आहेत. जे लोक चुकीचे कर्म करतात, अन्याय करतात त्यांना शनिदेव दंड देतात. परंतु, ज्याची कर्म चांगले आहेत आणि प्रामाणिकपणे जीवन जगतात त्यांना शनि देवाचा आशीर्वाद मिळतो.

भारतात शनि देवाची बरीच मंदिरे आहेत, पण त्यातली काही मंदिरे अशी आहेत की त्यात साक्षात शनिदेव विराजमान आहे. हे शनि मंदिरं त्यांच्या श्रद्धा आणि भव्यतेमुळे विशेष प्रसिद्ध आहेत. असे म्हणतात की या मंदिरांमध्ये शनि देवाची पूजा केल्याने भक्तांना शनि दोषापासून मुक्ती मिळते आणि जीवनातील अडचणी दूर होतात. चला, जाणून घेऊया अशा पाच प्रसिद्ध शनि मंदिरांबद्दल. पण त्यातली काही मंदिरे अशी आहेत की त्यात साक्षात शनिदेव शनिदेव विराजमान आहे.

1. शनि शिंगणापुर – महाराष्ट्र (shani shingnapur temple in india)

शनि शिंगणापुर हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात आहे. हे मंदिर जगातील सर्वात चमत्कारी शनि मंदिर मानले जाते, कारण याला कोणतीही भिंत किंवा छत नाही. येथे येणाऱ्या भक्तांना श्रद्धेनुसार तेल वाहून प्रार्थना करण्याची परंपरा आहे. विशेष म्हणजे या मंदिरात कुठलेही पुजारी नाहीत आणि गावातील घरांना दरवाजेही नाहीत, कारण असे मानले जाते की येथे चोरी होत नाही. हे मंदिर खास आहे . शनिशिंगणापूर येथे व्यासपीठावर शनि देवाची पाच फूट उंच काळ्या दगडाची मूर्ती आहे. जी शनि देवाच्या रूपात पूजली जाते. हे व्यासपीठ किंवा ही जागा सोनई या नावाने ओळखली जाते आणि शनिशिंगणापूरच्या मध्यभागी स्थित आहे. हे मंदिर जगातील सर्वात चमत्कारी शनि मंदिर मानले जाते. दरवर्षी हजारो भाविक शनि देवाच्या दर्शनासाठी शनिशिंगणापूरला येतात.

2. शनि मंदिर – इंदौर (Shani Mandir Indore)

मध्य प्रदेशातील इंदौर शहरात एक प्राचीन शनि मंदिर आहे. हे मंदिर भारतातील सर्वात प्राचीन शनि मंदिरांपैकी एक आहे. जिथे असे मानले जाते की न्यायाचे देवता शनिदेव स्वतः प्रकट झाले होते. या मंदिराचे एक वैशिष्ट्य आहे की या मंदिरामध्ये शनि देवाचा सोळा शृंगार केला जातो. तसेच त्यांना तेलासोबत दूध आणि पाणीही अर्पण केले जाते. या मंदिरात दररोज भाविकांची खूप गर्दी असते. पण विशेषतः शनिवारी दूरदूरच्या भागांतून लोक येथे पूजा करण्यासाठी येतात. श्रद्धाळूंना विश्वास आहे की या मंदिरात दर्शन घेतल्याने त्यांच्या जीवनातील अडचणी दूर होतात आणि त्यांना शनि दोषापासून मुक्ती मिळते.

3. तिरुनल्लर शनि मंदिर, तामिळनाडू (Thirunallar Saneeswaran Temple)

तामिळनाडूमधील तिरुनल्लर शनि मंदिर हे प्रमुख आणि पवित्र मंदिरांपैकी एक मानले जाते. असे म्हटले जाते की ज्या व्यक्तींवर शनिदेवाची कृपा नसते, त्यांनी येथे दर्शनासाठी यावे. हे मंदिर तिरुनल्लरमध्ये स्थित असून, तामिळनाडूमधील नवग्रह मंदिरांपैकी एक आहे. तिरुनल्लर शनिश्वरन मंदिर हे नवग्रह मंदिरांपैकी एक आहे. जरी या मंदिराचे मुख्य देवता भगवान शिव असले, तरी हे मंदिर विशेषतः शनिदेवासाठी ओळखले जाते, कारण येथे ते भगवान शिवाचे द्वारपाल मानले जातात. असे मानले जाते की भक्तांनी प्रथम शनिदेवाची कृपा मिळवली तरच त्यांना भगवान शिवाचे दर्शन लाभते. भारतामध्ये असलेल्या सर्व शनि मंदिरांपैकी हे मंदिर अत्यंत पवित्र मानले जाते. असे विश्वास आहे की या मंदिरात भगवान शिवाची पूजा केल्याने शनि ग्रहाच्या अशुभ प्रभावांपासून मुक्ती मिळते आणि जीवनातील अडथळे दूर होतात.

4. शनि धाम, प्रतापगड, उत्तर प्रदेश (Shree Shani dev dham, Pratapgarh, Uttar Pradesh)

उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील हे मंदिर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. हे उत्तर प्रदेशातील सर्वात प्रसिद्ध शनि मंदिरांपैकी एक आहे, जिथे देशभरातून भक्त शनिदेवाची पूजा करण्यासाठी येतात. हे मंदिर प्रतापगड जिल्ह्यापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. या मंदिराची खासियत म्हणजे येथे येताच भक्तांचे दुःख आणि संकटे दूर होतात, असे मानले जाते. हे मंदिर शनि धाम नावाने ओळखले जाते आणि ते शनिदेवाच्या चमत्कारी मंदिरांपैकी एक मानले जाते.

5. शनिचरा मंदिर, मुरैना, मध्य प्रदेश (Sanichara Mandir,Madhya Pradesh)

मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातील हे शनि मंदिर विशेष महत्त्वाचे आहे. शनि मंदिर मुरैना जिल्ह्यातील असून ते ग्वालियरच्या जवळ असल्यामुळे अनेक भक्त याला ग्वालियरचा शनी मंदिर म्हणूनही ओळखतात. हे मंदिर शनिचरा पर्वतावर आहे आणि असे मानले जाते की येथे पूजा केल्याने भक्तांचे शनि दोष दूर होतात. या मंदिरात शनि देवाच्या मूर्तीवर तेल अर्पण करण्याची परंपरा आहे, ज्यामुळे जीवनातील अडचणी दूर होतात. श्री शनिचरा मंदिराबद्दल एक ऐतिहासिक कथा आहे की, त्रेतायुगात भगवान हनुमान यांनी लंकेहून शनिदेवांचा अलौकिक पिंड येथे फेकला होता. त्यामुळे या ठिकाणाला शनिदेवांचे सिद्धपीठ मानले जाते. असे मानले जाते की येथे दर्शन घेतल्याने शनिदेवाच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते आणि भक्तांचे जीवन सुखमय होते. येथे प्रत्येक शनिश्चरी अमावस्याच्या दिवशी भव्य मेळा भरतो, ज्यामध्ये लाखो श्रद्धाळू सहभागी होतात. भाविक येथे शनि देवासाठी दान-पुण्य, अभिषेक, तेल अर्पण आणि विविध धार्मिक विधी करून शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी प्रार्थना करतात.