Haripath Lyrics in Marathi - vedicstotra.com

हरिपाठ – संत ज्ञानेश्वर माउलींचा हरिपाठ

Kathaye ( कथाएँ )

।। जय जय राम कृष्णहरि ।।

॥ श्री ज्ञानदेव हरिपाठ ॥

१- देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥ हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा।पुंण्याची गणना कोण् करी ॥२॥ असोनि संसारीं जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥ ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवांघरीं ॥४॥

३- त्रिगुण असार निर्गुण हें सार । सारासार विचार हरिपाठ ॥१॥ सगुण निर्गुण गुणाचें अगुण । हरिवीणें मन व्यर्थ जाय ॥२॥ अव्यक्त निराकार नाहीं ज्या आकार । जेथुनि चराचर हरिसी भजें ॥३॥ ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । अनंत जन्मांनी पुण्य होय ॥४॥

५- योगयागविधि येणें नोहे सिद्धी । वायांचि उपाधि दंभ धर्म ॥१॥ भावेंविण देव न कळे नि:संदेह । गुरुविण अनुभव कैसा कळे ॥२॥ तपेंवीण दैवत दिधल्याविण प्राप्त । गुजेंविण हित कोण सांगे ॥३॥ ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात । साधूचे संगती तरणोपाय ॥४॥

७- पर्वताप्रमाणे पातक करणें । वज्रलेप होणें अभक्तासी ॥१॥ नाहीं ज्यांसी भक्ति ते पतित अभक्त । हरिसी न भजत दैवहत ॥२॥ अनंत वाचाळ बरळती बरळ । त्यां कैंचा दयाळ पावे हरि ॥३॥ ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान । सर्वांघटीं पूर्ण एक नांदे ॥४॥

९- विष्णुविण जप व्यर्थ त्याचें ज्ञान । रामकृष्णीं मन नाहीं ज्याचें ॥१॥ उपजोनी करंटा नेणें अद्वय वाटा । रामकृष्णीं पैठा कैसेनी होय ॥२॥ द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान । तया कैचें कीर्तन घडे नामीं ॥३॥ ज्ञानदेव म्हणे सगुण हें ध्यान । नामपाठ मौन प्रपंचाचे ॥४॥

।। जय जय राम कृष्णहरि ।।जय जयरामकृष्ण हरि ।।

११- हरि उच्चारणीं अनंत पापराशी । जातील लयासी क्षणमात्रे ॥१॥ तृण अग्निमेळें समरस झालें । तैसें नामें केलें जपतां हरि ॥२॥ हरि उच्चारण मंत्र पै अगाध । पळे भूतबाधा भेणे तेथें ॥३॥ ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ । न करवे अर्थ उपनिषदां ॥४॥

१३- समाधि हरिची सम सुखेंवीण । न साधेल जाण द्वैतबुद्धि ॥१॥ बुद्धीचें वैभव अन्य नाहीं दुजें । एका केशवराजें सकळ सिद्धि ॥२॥ ऋद्धि सिद्धि निधी अवघीच उपाधि । जंव त्या परमानंदीं मन नाहीं ॥३॥ ज्ञानदेवी रम्य रमलें समाधान । हरिचें चिंतन सर्वकाळ ॥४॥

१५- एक नाम हरि द्वैतनाम दुरी । अद्वैत कुसरी विरळा जाणें ॥१॥ समबुद्धि घेतां समान श्रीहरि । शमदमांवरी हरि झाला ॥२॥ सर्वांघटीं राम देहांदेहीं एक । सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी ॥३॥ ज्ञानदेवा चित्तीं हरिपाठ नेमा । मागिलिया जन्मा मुक्त झालों ॥४”||

१७- हरिपाठकीर्ति मुखें जरी गाय । पवित्रचि होय देह त्याचा ॥१॥ तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमूप । चिरंजीव कल्पकोटि वैकुंठीं नांदे ॥२॥ मातृपितृभ्राता सगोत्र अपार । चतुर्भुज नर होऊनि ठेले ॥३॥ ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधलें । निवृत्तीनें दिधले माझे हातीं ॥४॥

||जय जय विठोबा रखुमाई ||

१९- नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी । पापे अनंत कोटी गेली त्यांची ॥१॥ अनंत जन्मांचे तप एक नाम । सुगम हरिपाठ ॥२॥ योग याग क्रिया धर्माधर्म माया । गेले ते विलया हरिपाठीं ॥३॥ ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म । हरिविण नेम नाहीं दुजा ॥४॥

२१- काळ वेळ नाम उच्चारितां नाही । दोन्ही पक्ष पाहीं उद्धरती ॥१॥ रामकृष्ण नाम सर्व दोषां हरण । जडजीवां तारण हरि एक ॥२॥ हरिनाम सार जिव्हा या नामाची । उपमा त्या देवाची कोण वानी ॥३॥ ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ । पूर्वजां वैकुंठ-मार्ग सोपा ॥४॥

२३- सात पांच तीन दशकांचा मेळा । एक तत्त्वीं कळा दावी हरि ॥१॥ तैसें नव्हे नाम सर्वत्र वरीष्ठ । तेथें कांहीं कष्ट न लागती ॥२॥ अजपा जपणें उलट प्राणाचा । तेथेंहि मनाचा निर्धार असे ॥३॥ ज्ञानदेवा जिणें नामेंविण व्यर्थ । रामकृष्णीं पंथ क्रमियेला ॥४॥

२५- जाणीव नेणीव भगवंतीं नाहीं । हरि उच्चारणीं पाही मोक्ष सदां ॥१॥ नारायण हरि उच्चार नामाचा । तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥२॥ तेथील प्रमाण नेणवें वेदांसी । तें जीवजंतूंसी केंवी कळे ॥३॥ ज्ञानदेवा फळ नारायण पाठ । सर्वत्र वैकुंठ केलें असे ॥४॥

२७- सर्व सुख गोडी साही शास्त्रें निवडी । रिकामा अर्धघडी राहूं नको ॥१॥ लटिका व्यवहार सर्व हा संसार । वायां येरझार हरिवीण ॥२॥ नाम मंत्र जप कोटी जाईल पाप । रामकृष्णीं संकल्प धरुनि राहें ॥३॥ निजवृत्ति हे काढी सर्व माया तोडी । इंद्रियां सवडी लपू नको ॥४॥ तीर्थी व्रतीं भाव धरी रे करुणा । शांति दया पाहुणा हरि करी ॥५॥ ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तिदेवीं ज्ञान । समाधि संजीवन हरिपाठ ॥६॥

||पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदॆव तुकाराम ||

२९- कोणाचे हे घर हा देह कोणाचा । आत्माराम त्याचा तोचि जाणे।। मी तू हा विचार विवेके शोधावा । गोविंदा माधवा याची देही।। देही ध्याता ध्यान त्रिकुटीवेगळा । सहस्त्रदळी उगवला सुर्य जैसा।। ज्ञानदेव म्हणे नायनाची ज्योती । या नावेरूपे ती तुम्हीं जाणा।।

।। इति श्रीज्ञानदॆव हरिपाठ समाप्त ।।

।। जय जय राम कृष्णहरि ।।।। जय जय राम कृष्णहरि ।।। जय जय राम कृष्णहरि ।।

Read More:

Watch Video:

Haripath By Vitthal Bhakti