मार्गशीर्ष गुरुवार व्रत

मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचं गुरुवारच व्रत कसं करावं ?

मराठी वर्षातील मार्गशीर्ष हा नववा महिना 28 नोव्हेंबरपासून सुरू होतो. जो हिंदूंसाठी अत्यंत शुभ मानला जातो. शास्त्रानुसार, “मासोनाम मार्गशीर्षोहम्” म्हणजे मार्गशीर्षासारखा शुभ महिना दुसरा नाही.

‘मार्गशीर्ष’ महिन्यातील प्रत्येक गुरुवार विशेष राहतो, विशेषतः महिलांसाठी. या दिवशी ‘वैभव लक्ष्मी’ किंवा ‘महालक्ष्मी’चे व्रत केल्याने आपल्या परिवाराला सुख-समृद्धी, शांतता आणि धनप्राप्ती होते . हिंदू कॅलेंडरच्या तिथीनुसार मार्गशीर्ष महिन्याला 28 नोव्हेंबर पासून सुरुवात होत असून 19 डिसेंबर पर्यंत मार्गशीर्ष महिना आहे. मार्गशीर्ष व्रताला महालक्ष्मी व्रत किंवा वैभव लक्ष्मी व्रत असे म्हटले जाते

या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवारपासून केली जाते .त्या दिवशी वैभव लक्ष्मीची मूर्ती स्थापन करून घट मांडला जातो. आणि शेवट चौथ्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते. त्यादिवशी सात किंवा नऊ सुवासनी ना हळदीकुंकू सौभाग्याचं वाण देऊन वैभव लक्ष्मी’च्या व्रतकथेचे पठण केले जाते

मार्गशीर्ष महिन्याचे महत्व

पौराणिक कथा मध्ये असे सांगितले आहे की मार्गशीष महिना हे विष्णूच स्वरूप मानलं जातं आणि विष्णूची पूजा महालक्ष्मी शिवाय होत नाही म्हणून मार्गशीर्ष महिन्याला खूप महत्त्व आहे .या महिन्यात प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी सोबत विष्णूची ही पूजा केली जाते हे व्रत केल्याने घरात सुख शांती समृद्धी आणि लक्ष्मीची कृपा होते.

मार्गशीर्ष महिना कालावधी

हिंदू कॅलेंडरनुसार मार्गशीर्ष महिना 28 नोव्हेंबर पासून ते 19 डिसेंबर पर्यंत आहे.

मार्गशीर्ष गुरुवार व्रत कसे करावे?

या दिवशी सकाळी लवकर उठून जिथे आपल्याला पूजा करायची तिथली जागा स्वच्छ करावी. नंतर त्या जागेवर पाठ किंवा चौरंग मांडून त्यावर एक नवीन कपडा अंथरावा. चौरंगा समोर सुंदर अशी रांगोळी काढावी.शक्यतो कपडा पिवळ्या किंवा लाल रंगाचा असावा. त्या कपड्यावर तांदळाची रास घालून तांब्याचा कळस मांडावा त्या कलशांमध्ये दूर्वा सुपारी एखादा पैसा आणि अक्षदा घालाव्यात. कलश मांडताना त्यामध्ये पाच फळांची पत्री किंवा आंब्याची पाने ठेवावी त्यावर एक नारळ ठेवावं नंतर कशाला पाच हळदी कुंकवाची बोट ओढावी.कलश मांडून झाल्यावर चौरंगावर महालक्ष्मी चा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. महालक्ष्मीच्या मूर्तीच्या पुढे विड्याच्या पानावर गणपतीची मूर्ती किंवा सुपारी ठेवून गणपतीची पूजा मांडवी.चौरंगावर सगळ्यात पुढे विड्याच्या पानावर खारीक खोबरे बदाम आणि हळकुंड ठेवावे. पाच फळे आणि एका वाटीत गुळ शेंगदाणे ठेवावे.

महालक्ष्मीची पूजा मांडून झाल्यावर पहिले गणपतीची पूजा करावी. गणपतीची पूजा झाल्यावर महालक्ष्मीच्या फोटोची किंवा मूर्तीची पूजा करावी. पूजा झाल्यानंतर महालक्ष्मीची किंवा गुरुवारची कथा वाचावी कथा वाचून झाल्यावर गणपतीची, विष्णूची, आणि श्री महालक्ष्मीची आरती करावी व नैवेद्य दाखवा. या दिवशी जे पण हे व्रत करतं त्यांनी पूर्ण दिवसभर उपवास करावा. उपवास करताना फक्त दूध आणि फळे खावी. संध्याकाळी देवीला गोड नैवेद्य बनवून आपला उपवास सोडावा.

दुसऱ्या दिवशी पूजेचे विसर्जन करताना कलशातील पाने पाण्यात किंवा नदीत सोडावी कळशातलं पाणी तुळशीला घालावे.हे असं मार्गशीर्ष महिन्यातला प्रत्येक गुरुवारी करावं आणि शेवटच्या गुरुवारी पूजेचे उद्यापन करावं. पूजेचे उद्यापन करताना सात किंवा नऊ सवाष्णीला हळदी कुंकवाचं वाण द्यावं.

महालक्ष्मी व्रताचे नियम

  • या व्रताची पूजा शक्यतो सकाळी लवकर करावी.
  • दिवसभर उपवास करावा उपवासामध्ये फक्त दूध आणि फळे घ्यावेत.
  • या दिवशी महालक्ष्मीची कहाणी वाचावी.
  • संध्याकाळी उपवास सोडण्याच्या पहिले देवीला गोड नैवेद्य दाखवावा.
  • शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे.
  • उद्यापन करताना सात कुमारीका किंवा सवाष्णींना हळदीकुंकू लावून फळ द्यावे त्याचबरोबर महालक्ष्मीच्या कहाणीच एक-एक पुस्तक द्यावं.

श्री महालक्ष्मीची आरती

टीप – वरील दिलेल्या लेख हा फक्त माहितीसाठी आहे हा पूर्णतः सत्य आहे, असा आम्ही दावा करू शकत नाही किंवा यामागे कुठलीही अंधश्रद्धा पसरवण्याचा वैदिकस्तोत्र चा हेतू नाहीये.

By vsadmin