Gudi Padwa 2025: गुढीपाडवा कधी आहे ? सणाची तारीख, महत्त्व, संपूर्ण माहिती

Blog

गुढीपाडवा म्हणजे काय ?

गुढीपाडवा म्हणजेच चैत्र महिन्यातला पहिला दिवस, या दिवसाला आपण चैत्र प्रतिपदा असे म्हणतो. ‘चैत्र प्रतिपदा’ या दिवसाला महाराष्ट्रात गुढीपाडवा म्हणतात. वर्षातील चार मुहूर्तापकी हा एक महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो. चैत्र हा हिंदूं कॅलेंडरनुसार वर्षातला पहिला महिना. चैत्र महिन्यापासून मराठी माणसाच्या नवीन वर्षाची सुरुवात होते. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूला सुरूवात होते. त्यामुळे संपूर्ण सृष्टी आनंदीत होते, हिरव्या रंगबिरंगी छटा झाडा- फुलांवर खुलून दिसतात, वसंतऋतू आपले सारे वैभव अगदी मुक्तहस्ताने मोकळ्या मनाने सृष्टीवर उधळीत असतो आणि अशा प्रसन्न आल्हाददायक वातावरणात आपल्या नव्या वर्षाची सुरूवात होते.

नवीन वर्षातल्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस म्हणजे वर्षप्रतिपदा, त्यालाच आपण गुढीपाडवा म्हणतो. हा दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा या नावाने ओळखला जातो. पण ‘चैत्र’ या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का? चैत्र महिन्याचे नाव चित्रा नक्षत्रावरून पडले आहे. या महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला ‘चैत्र पौर्णिमा’ म्हणतात, आणि त्या आधारावर हा महिना ‘चैत्र महिना’ म्हणून ओळखला जातो. संस्कृतमध्ये ‘चित्र’ म्हणजे विविध प्रकारचे. वसंत ऋतूमध्ये निसर्गाची शोभा अनेक प्रकारांनी फुलून आलेली असते, म्हणूनच या सुंदर महिन्याच्या पहिल्या दिवशी वर्षप्रतिपदा साजरी केली जाते.

गुढीपाडवा हा शब्द ‘गुढी’आणि ‘पाडवा’ या दोन अक्षरांनी बनला आहे. गुढी म्हणजे स्वातंत्र्याची ध्वजा व पाडवा म्हणजे विजयध्वज . असं म्हणतात की याच दिवशी ब्रम्हदेवाने जग उत्पन्न केले, सृष्टी निर्माण केली, प्रभु रामचंद्रांनी आपला चौदा वर्षाचा वनवास संपवून, रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्या नगरीत प्रवेश केला. त्यावेळी लोकांनी गुढ्या तोरणे उभारून त्यांचे स्वागत केले, तो दिवस म्हणजेच गुढीपाडवा.

गुढीपाडवा 2025 कधी आहे?

पंचांगानुसार, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी गुढीपाडवा 30 मार्च रोजी साजरा केला जाईल.

गुढीपाडव्याची पूजा कशी करावी ?

या दिवशी महाराष्ट्रात गुढी उभारण्याची प्रथा आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून कडुलिंबाचा कोवळा पाला, फुले स्वच्छ धुऊन गुढीच्या टोकाला कोरे वस्त्र कडुलिंबाच्या पालासहित बांधतात व त्यावर एक तांब्याचा कलश पालथा मारतात. त्याला साखरेचे कंगन व हार घालून गुढीची पूजा केली जाते. पूजा झाल्यावर गुढी घराच्या बाहेर उंच ठिकाणी उभारून तिला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात . या दिवशी गुढी सायंकाळी चार वाजेपर्यंत किंवा चार वाजेच्या आत हळद-कुंकू अक्षदा वाहून पूजा करून गुढी उतरवली जाते.

गुढीपाडव्याच्या पूजेचे साहित्य

गुढीकरिता पितळेचे, तांब्याचे किंवा चांदीचे भांडे, कडुलिंबाचा डगळा, साखरेची गाठीहार, जरीचा खण, कापड किंवा साडी, फुलांची माळ व वेळुची काठी इ. साहीत्य घेऊन गुढीला, हळदकुंकू वहावे दारावर आंब्याच्या पानांचे तोरण लावावे. या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा

गुढीपाडव्याची कथा

गुढीपाडवा का साजरा करतात त्याच्या मागची कथा अशी सांगते की कैकैयीच्या शापामुळे प्रभु रामचंद्र, लक्ष्मण, सीता यांनी १४ वर्षे वनवासात काढली. यावेळी भरत अयोध्येचे राज्य चालवित होता. तो श्रीरामचंद्राच्या येण्याचीच वाट पहात होता. १४ वर्षे पूर्ण झाली. उद्या सकाळी ठरल्याप्रमाणे जर प्रभु रामचंद्र आले नाहीत तर आपण स्वतःला जाळुन घ्यायचे असे त्याने ठरवले, तशी तयारी पण केली व मनोमन राम, सीतामाई व लक्ष्मण यांचे स्मरण केले आणि तो चितेकडे निघाला एवढ्यात नवल घडले महाबली वीर हनुमान पुढे आला, भरतास वंदन करून त्याने श्रीराम येत असल्याची सूचना दिली.

भरताला खूप आनंद झाला त्याने शत्रुघ्नाला सांगितले की संपूर्ण अयोध्या नगरी सजवा, श्रीरामांच्या स्वागताची तयारी करा, सर्वत्र आनंदी-आनंद झाला नंदीग्रामापासून अयोध्यापर्यंत लोकांनी सुगंधी पाण्याचा सडा टाकला. शंख, शिंगे, झांजा यांच्या आवाजाने सारे आकाश दुमदुमले. श्रीरामांचे पुष्पक विमान खाली उतरले. श्रीरामांच्या दर्शनासाठी सर्वांच्या डोळ्यात प्राण साठले होते. श्रीरामांच्या जयनादाने संपूर्ण अयोध्या नगरी दणाणुन गेली. भरत श्रीरामांच्या पादुका डोक्यावर घेऊन पुढे आला. भावाभावांची भेट झाली ते दृश्य पाहुन अयोध्या वासियांच्या डोळ्यात आनंदाश्रुंचा पुरच लोटला लोकांनी घरोघरी मोठ्या आनंदाने तोरणे बांधली गुढ्या उभ्या केल्या व आपला आनंद व्यक्त केला. तोच हा दिवस म्हणजे “गुढीपाडवा” तेव्हापासुन ही परंपरा सुरू झाली.

गुढीपाडवा संबंधित वारंवार विचारलेले प्रश्न

गुढीपाडवा म्हणजे काय?

गुढीपाडवा हा एक हिंदू सण आहे, जो विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटका, आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्ये साजरा केला जातो. हा सण मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या अयोध्येत परत येण्याच्या दिवशी साजरा केला जातो.

गुढीपाडवाचे धार्मिक महत्त्व काय आहे?

गुढीपाडवा हा सण श्रीरामाच्या अयोध्येत परत येण्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. तसेच, या दिवशी सम्राट शालिवाहनाने शकांवर विजय प्राप्त केला, त्यामुळे लोकांच्या घरी गुढी उभारली जात होती, अशी मान्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयाची आठवण म्हणून काही लोक गुढी उभारतात. या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली, अशी धार्मिक श्रद्धा आहे, म्हणून गुढीला ब्रह्मध्वज मानले जाते, तसेच त्याला इंद्रध्वज असेही संबोधले जाते.

गुढीपाडवा सणाचे सांस्कृतिक महत्त्व काय आहे?

गुढीपाडवा हा सण नवीन वर्षाच्या प्रारंभाचा प्रतीक आहे आणि तो समृद्धी, सुख, आणि आनंदाचा संदेश देतो. तसेच, शेतकऱ्यांसाठी हा सण नवीन पिकांच्या प्रारंभाची खूप महत्त्वाची वेळ आहे.

गुढी कशाप्रकारे उभारली जाते?

गुढी उभारण्यासाठी एक लांब काठी, एक उलट पाते, रंगीबेरंगी कापडे, आणि तुळशीच्या पात्या, काजू, आणि सुपारी ठेवले जातात. गुढीला एक विशेष ठिकाणी उभारले जाते, आणि त्या ठिकाणी घरातील सदस्य पूजा करतात.

गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया यामध्ये काय फरक आहे?

गुढीपाडवा हा सण संक्रांतीचा प्रारंभ दर्शवतो, तर अक्षय तृतीया हा दुसऱ्या प्रकारचा शुभ दिवस आहे जो विशेषतः व्यापार आणि कर्ज वसूल करण्यासाठी शुभ मानला जातो.

गुढीपाडवा सण कधी आणि कुठे साजरा करावा लागतो?

गुढीपाडवा हा सण हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो, जो मार्च किंवा एप्रिल महिन्यात येतो.

गुढीपाडवा आणि दिवाळीमध्ये काय समानता आहे?

गुढीपाडवा आणि दिवाळी दोन्ही सण नवीन वर्षाच्या प्रारंभाचे प्रतीक आहेत. दोन्ही सणांमध्ये गुढी उभारणे, घरातील सदस्यांसोबत एकत्र येणे आणि समृद्धीच्या प्रतीक म्हणून पूजा करणे याचे समान वैशिष्ट्य आहे.