छत्रपती शिवाजी महाराज जयंती
प्रत्येकवर्षी १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. हा दिवस त्यांच्या जन्माची व पराक्रमाची आठवण करून देतो. शिवजयंती महाराष्ट्रसह संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. महाराष्ट्रात शिवजयंतीचा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो, कारण शिवाजी महाराजांनी बलाढ्य साम्राज्यांविरुद्ध लढा देत एक शक्तिशाली मराठा साम्राज्य उभारले.
शिवाजी महाराजांचा जन्मदिवस
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. सन १६३० मध्ये याच दिवशी त्यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर, पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले आणि आईचे नाव जिजाबाई भोसले होते. जिजाबाई भोसले या धार्मिक आणि धैर्यशील महिला होत्या. त्यांनी देवी शिवाईच्या नावाने शिवाजी असे नाव ठेवले. त्यांच्या लहानपणीच रामायण आणि महाभारत यांसारख्या धर्मग्रंथांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. जिजाऊ माता चा शिकवणीमध्येच शिवाजी महाराज लहानचे मोठे झाले. शिवाजी महाराज भगवान शिव आणि देवी तुळजाभवानी यांचे भक्त होते. त्यांनी बीजापूरच्या आदिलशाही सल्तननंपासून स्वतंत्र राज्य निर्माण केले, ज्यामुळे मराठा साम्राज्याची सुरुवात झाली.
इतिहासानुसार, १६ व्या वर्षी शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला आणि नंतर रायगड व कोंडाणा किल्ल्यांवर विजय मिळवला. त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा संकल्प केला आणि ते पूर्ण केले.
शिवाजी महाराज एक कुशल युद्धनितीकार होते. त्यांनी मुघलांशी अनेक लढाया जिंकल्या आणि मराठा साम्राज्य स्थापन केले.
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक
६ जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि त्यांना छत्रपती ही उपाधी देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज हे अत्यंत कुशल युद्धनितीकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी मुघलांविरुद्ध अनेक युद्धे जिंकून मराठा साम्राज्याची स्थापना केली. त्यांनी स्वतंत्र आणि सुशासनयुक्त राज्य निर्माण केले. त्यांच्या उत्तम नेतृत्वगुणांमुळे त्यांची गणना अलेक्झांडर, नेपोलियन, अकबर आणि अशोक यांच्यासारख्या महान शासकांमध्ये केली जाते.
शिवाजी महाराजांच्या काही महत्वाच्या लढाया
- अफजलखानाचा पराभव – आदिलशाहीने अफजलखानाला शिवाजी महाराजांचा नाश करण्यासाठी पाठवले. शिवाजी महाराजांनी युक्तीने अफजलखानाचा वध केला आणि त्यांच्या सैन्यावर हल्ला केला.
- पन्हाळ्याचा वेढा आणि पावनखिंडीचा संग्राम– सिद्धी जोहरच्या मोठ्या सैन्याचा सामना करताना बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या वीरांनी प्राणांची आहुती देत शिवाजी महाराजांना सुरक्षित विशाळगडावर पोहोचवले.
- उंबरखिंडची लढाई – थोड्या मावळ्यांच्या मदतीने शिवाजी महाराजांनी मुघल सरदार कारतलाब खानचा पराभव केला.
- शाइस्ताखानावर हल्ला – मुघल सेनापती शाइस्ता खान पुण्याच्या लाल महालात मोठ्या सैन्यासह राहत असताना, शिवाजी महाराजांनी मध्यरात्री ३०० मावळ्यांसह छापा टाकून त्याला पराभूत केले.
- सुरत लूट – मुघल साम्राज्याच्या आर्थिक केंद्र असलेल्या सुरत शहरावर हल्ला करून मोठ्या प्रमाणात संपत्ती हस्तगत केली.
- पुरंदरची संधी – मुघल सरदार मिर्झाराजे जयसिंग यांच्यासोबत तह केला, ज्यामुळे काही किल्ले गमावले, पण भविष्यातील विजयांसाठी संधी मिळाली.
- आग्रा कारागृहातून सुटका – औरंगजेबाने शिवाजी महाराजांना बंदी ठेवले, पण त्यांनी युक्तीने गोड्याच्या पेट्यांमध्ये लपून सुटका केली.
- ब्रिटिश आणि परकीय सत्तांविरुद्ध धोरण – इंग्रज, पोर्तुगीज आणि सिद्दी यांच्याशी सावध राजकारण ठेवत मराठ्यांची सत्ता वाढवली.
- कर्नाटक मोहीम – दक्षिण भारतातील जिन्जीपर्यंत आपले साम्राज्य वाढवले.
छत्रपती शिवाजी महाराज हे अत्यंत कुशल युद्धनितीकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी मुघलांविरुद्ध अनेक युद्धे जिंकून मराठा साम्राज्याची स्थापना केली. सन १६७४ मध्ये रायगड किल्ल्यावर त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला आणि त्यांना ‘छत्रपती’ही उपाधी देण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती कशी साजरी केली जाते?
शिवाजी महाराजांची जयंती हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण मानला जातो , जो संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहाने आणि अभिमानाने साजरा केला जातो. या दिवशी विविध कार्यक्रम, नाटके आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये मराठा परंपरा आणि इतिहासाचे दर्शन घडवले जाते.
शिवजयंतीच्या निमित्ताने भव्य मिरवणुका काढल्या जातात, ज्या वेळी लोक शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांच्या वेशभूषेत सहभागी होतात. शिवजयंतीचा दिवस महाराष्ट्रातील लोकांसाठी अभिमानाचा आणि प्रेरणादायी दिवस मानला जातो. महाराष्ट्रासोबतच गोवा आणि कर्नाटक राज्यांतही शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते.