मकरसंक्रांत म्हटलं की तिळगुळ घ्या गोड गोड बोला, नवीन वर्षाचा नवीन सण. मराठी महिनाच्या पौष महिन्यात येणारा हा सण आहे. संक्रांतीचा उत्सव निसर्गाचा उत्सव म्हणून ओळखला जातो. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणुन या उत्सवाला ‘मकरसंक्रांत’ असे म्हणतात. या महिन्यात सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो. तो उत्तरेकडे सरकत जात असतो म्हणुन त्या काळाला ‘उत्तरायण’ असेही म्हणतात. सूर्याच्या संक्रमणाशी जीवनाचे संक्रमणही जोडलेले आहे. या दृष्टीने या उत्सवाचे सांस्कृतिक दृष्ट्यादेखील महत्व आहे.
मकर संक्रांत हा एक धार्मिक सण आहे. संक्रांत म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणे होय. अशा बारा संक्रांत असतात, परंतु आपण एकच संक्रांत मोठी मानतो. संक्रांतीला दान करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. असे म्हणतात की या दिवशी आपण जे दान करतो ते आपल्याला सूर्य परत करत असतो. संक्रांतीचा सण तीन दिवसांचा असतो. भोगी, क्रिक्रांत हा सण रथसप्तमी पर्यंत साजरा करण्याची पद्धत आहे.
संक्रांत हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. देशातील विविध भागांमध्ये मकर संक्रांती वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. या या ब्लॉग मध्ये मकर संक्रांती महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजन विधी याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. तसेच, 2025 मध्ये मकर संक्रांती कधी आहे, याबद्दल माहिती घेऊया.
मकर संक्रांती 2025 कधी आहे?
पंचांगानुसार, सूर्य 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8 वाजून 55 मिनिटांनी धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे, मकर संक्रांतीचा सण मंगळवार, 14 जानेवारी 2025 रोजी साजरा केला जाईल.
मकर संक्रांतीचे महत्त्व
मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, त्यामुळे या दिवशी सूर्य उपासनेला विशेष महत्त्व दिले जाते. धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.
या सणाविषयी कथा अशी आहे की, पूर्वी शंकासुर या नावाचा एक दैत्य होता. त्याचा नाश करण्यासाठी देवीने संक्रांती रूप धारण केले. ही देवता साठ योजनेत पसरली असून तिचे ओठ-नाक लांबलचक असून तिला नऊ हात असून तिची
आकृती पुरूषासारखी आहे. प्रत्येक वर्षी तिचे वाहन आयुधे बदलतात अशी कल्पना आहे. संक्रासुरआणि नीसांसुर अशा दोन राक्षसांचा वध केला म्हणुन या दिवसाला तिच्याच नावाने ओळखतात. या दिवशी सुवासीनी स्त्रीया वाण देतात व घेतात अशी पध्दत आहे.
भीष्म पितामहांनी बाणांच्या शय्येवर असताना आपल्या प्राणांचा त्याग मकर संक्रांतीच्या दिवशी केला होता. त्यांना उत्तरायणातील या दिवशी प्राण सोडल्याने मोक्ष प्राप्त झाला, असे मानले जाते. गीतेनुसार, उत्तरायणाच्या सहा महिन्यांत शुक्ल पक्षात प्राण सोडल्यास व्यक्ती जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो. भिष्म उत्तरेकडील स्वर्गद्वारे उघडेपर्यंत शरपंजरी पडून राहिले व तद्नंतर देह सोडला म्हणून या दिवशी, पितर, सवाष्ण जेवायला घालतात. आर्यांनीच सूर्यांचे शक्तीमुळे विश्वातील सर्व कारभार चालू असल्याचा शोध लावला. सूर्याची उपासना करून गायत्री मंत्रासारखा दिव्य मंत्र विश्वामित्राला स्वतः सूर्याने विश्वाच्या कल्याणासाठी दिला. त्यांनीही तो स्वतः जवळ न ठेवता तमाम मानव जातीस देऊन संबंध विश्वाचे मित्रत्व व भारतीय संस्कृतीचा आदर्श ठेवला. सूर्य हा संबंध विश्वाचा खरा निरपेक्ष मित्र आहे. त्याच्या पूजेचा हा दिवस आणि याच आदर्शातून मित्रत्वाची वाढ व्हावी म्हणून या दिवशी मोठ्यांनी लहानास तिळगूळ देण्याची पद्धत आहे.
मकर संक्रांती पूजन विधी
मकर संक्रांतीला गंगास्नान, सूर्य उपासना, आणि दान यांना विशेष महत्त्व आहे.
सकाळी लवकर उठून गंगास्नान किंवा स्वच्छ पाण्याने स्नान करून सूर्याला अर्घ्य देण्याची पद्धत आहे .
या दिवशी सुवासिनी सूर्याची पूजा करून दुसऱ्या हंगामातील धान्य ,फळे ,ओला हरभरा, बोर ऊस वगैरे पूजनाची पद्धत आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
प्र. मकर संक्रांती 2025 मध्ये कोणत्या दिवशी आहे?
उ. मकर संक्रांती 14 जानेवारी 2025 रोजी मंगळवारी साजरी होईल.
प्र. मकर संक्रांतीचे महत्त्व काय आहे?
उ. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी प्राण त्यागल्यास मोक्ष प्राप्त होतो. तसेच, सूर्य आणि शनिदेवाच्या मिलनामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आहे.
मकर संक्रांती हा सण धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी साधलेल्या पुण्यकर्मांनी जीवनात सकारात्मकता आणि समृद्धी येते.