Satyanarayan aarati with vedic stotra

Satyanarayan Aarti Lyrics in Marathi 

जय जय दीनदयाला सत्यनारायण देवा
पंचारति ओवाळू श्रीपति तुज भक्तिभावा || धृ ||

युक्त पूजुनी करिती पुराण श्रवण ॥
परिमल द्रवरूप पुष्पमाळा अर्पून ॥
घृतयुक्त शर्करामिश्रित गोधूमचूर्ण ॥
प्रसाद भक्षणासाठी तू त्या प्रसन्ननारायण ॥ 1 ||
जय जय दीनदयाला सत्यनारायण देवा ||

शतांदे विप्रें पूर्वी व्रत हेन आचरिलें ॥
दरिद्र दवडुनि अंती ते मोक्षपदा नेलें ॥
त्यापासुनि हेन व्रत या कलियुगीं सकळां श्रुतंदें ॥
भावार्थें पूजितां सर्वां इच्छित लाधलें ॥ 2 ||
जय जय दीनदयाला सत्यनारायण देवा ||

साधुवैश्ये संततिसाठीं तुजला प्रार्थिलें ॥
इच्छित पुरता मदांध विवरण व्रत न आचरिलें ॥
त्या पापानें संकटीं पडुनि दुःख भोगीलें ॥
स्मृति होउनि आचरितां व्रत त्या तुवांचि उद्धरिले ॥ 3 ||
जय जय दीनदयाला सत्यनारायण देवा ||

प्रसाद विसरुनि पतिभेटीला कलावती ॥
क्षोभ तुझा होतांचि तयाची नौका बुडाली ॥
अंगध्वजरासी यापरि दुःखस्थिती आली ॥
मृत वार्ता शतपुत्रांची सत्वर कर्णी परिसीली ॥ 4 ||
जय जय दीनदयाला सत्यनारायण देवा ||

पुनरपि पूजुनि प्रसाद ग्रहण तत्क्षणी ॥
पतिची नौका तरली देखे कलावती नयनीं ॥
अंगध्जरायासी पुत्र भेटिवहि ॥
तू भक्तां संकटीं पावसी तू चक्रपाणी ॥ 5 ||
जय जय दीनदयाला सत्यनारायण देवा

अनन्यभावे पूजुनि हे व्रत जेजन आचरती ॥
इच्छित पुरविसि शें देउनि संतति ॥
संहरसी भवदुरितें सर्वहि बंधने तुटती ॥
राजा रंका समान मानुनि पावसि श्रीपती ॥ 6 ||
जय जय दीनदयाला सत्यनारायण देवा

तो तव्रतमहिमा अपार वर्णूं मी कैसा ||
भक्तिपुरःसर आचरती त्यां पावसि जगदीशा ||
भक्तांचा कनवाळू कल्पद्रुम तूं सर्वेशा ॥
मोरेश्वरसुत वासुदेव तुज विनवी भवनाशा ॥ 7 ||
जय जय दीनदयाला सत्यनारायण देवा ||

हिंदू धर्मात सत्यनारायण देवाला अत्यंत महत्त्व आहे. सत्यनारायण पूजा ही हिंदू संस्कृतीतील महत्त्वाच्या आराधना असून, ज्यात भगवान विष्णूच्या सत्यरूपी स्वरूपाची पूजा केली जाते. हिंदू घराण्यात या पूजेला अत्यंत महत्त्व आहे आणि सामान्यतः, शांती, समृद्धी, आणि संपूर्ण कल्याणासाठी भगवान सत्यनारायणाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी पूजा केली जाते.

सत्यनारायण पूजा विशेष विधीने साजरी केली जाते. या पूजेत सत्यनारायण भगवानचे पूजन करून मंत्र, आरती, अन्न प्रसाद, व सत्यनारायण कथा सांगून पूजा संपूर्ण केली जाते.

Print Friendly, PDF & Email

By vsadmin