नारळी पौर्णिमा 2024

श्रावण महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमा हा कोळी समाजाचा सर्वात महत्त्वाचा सण मानला जातो .महाराष्ट्र आणि कोकण भागात तसेच गोवा आणि गुजरातच्या समुद्र किनारपट्टी च्या भागात नारळी पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. कोळी लोक हा सण मोठ्या आनंदाने आणि पारंपारिक पद्धतीने साजरा करतात. नारळी हा शब्द नारळापासून आला आहे नारळी पौर्णिमेला कोळी लोक किंवा मच्छीमारी समुद्रात नारळ अर्पण करून दिवसभर उपवास ठेवतात. आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी वरुण देवाकडे प्रार्थना करतात. या दिवशी अन्नही सेवन करत नाही . बरेच लोक या दिवशी फक्त नारळापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करतात. पौर्णिमेच्या दिवशी मच्छीमारी समुद्रदेवतेची पूजा करतात अशा पद्धतीने ते आपली नारळी पौर्णिमा साजरी करतात.

या पौर्णिमेचे आणखी एक नाव आहे ‘पोवती पौर्णिमा’ पोवती याचा अर्थ पवित्र असा आहे. पोवते घालण्याच्या विधीस पवित्रारोपण असे नाव आहे. या दिवशी सुताची पोवती देवास तर्पण करायची व स्वतः गळ्यात किंवा बोटावर घालण्याची पध्दत आहे.
या पौर्णिमेला ‘नारळी पौर्णिमा’ पण म्हणतात कोळी लोकांचा हा मोठा सण. या समुद्राची पूजा करतात. या दिवसापासुन समुद्र शांत व्हावा. बोटी, जहाचे चालू व्हावेत लाठी लोक जलदेवतेची पूजा करतात. काही लोक समुद्रात नारळ अर्पण करतात.
नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरूण देवतेसाठी समुद्राची पूजा करून नारळ अर्पण करतात.

वरुण ही पर्जन्याची देवता या पौर्णिमेच्या आधी दोन महिने भरपूर पाऊस पडत असतो. समुद्रावर वादळी वारे वाहतात समुद्र खवळलेला असतो. त्याचे ते स्वरूप भयंकर असते त्या स्थितीत समुद्रात संचार करणे अशक्य असते. श्रावणी पौर्णिमेपासुन समुद्र शांत होतो.

नारळी पौर्णिमेचा शुभ मुहूर्त 

19 ऑगस्ट रोजी पहाटे 3 वाजून 4 मिनिटांनी सुरु होईल आणि याच दिवशी रात्री 11 वाजून 55 मिनिटांनी समाप्त होईल.

रक्षाबंधन

नारळी पौर्णिमा या सणाला रक्षाबंधन असेही म्हणतात. रक्षाबंधन हा सण सर्व स्त्रियांमध्ये खूप लोकप्रिय आहे. हा सण बहीण-भावाचा आहे. या दिवशी बहीण भावाच्या हाताला राखी बांधते, त्याला ओवाळते, आणि मिठाई किंवा पेढा खाऊ घालते. बहीण भावाच्या सुखी जीवनाची आणि दीर्घायुष्याची मनापासून प्रार्थना करते. राखी हे भावासाठी एक प्रकारचं सुरक्षा कवच असतं. बहीण भावाच्या संरक्षणासाठी त्याला राखी बांधते, आणि या सोहळ्यात दोघांच्या नात्याची जास्तच घट्ट होत असते.

रक्षाबंधन कधी आहे?

हिंदू पंचागानुसार, श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला 19 ऑगस्ट 2024 रोजी सोमवारी रक्षाबंधन आहे.

रक्षाबंधन कथा

गुजरातचा बादशहा बाहादुरशहाने चितोडराज्यावर हल्ला केला. त्यावेळी चित्तोडचा कारभार राणी कुमावती पहात होती. तिने त्याच्याशी निकराने युध्द केले, पराक्रम गाजवला पण बहादुरशहाच्या सैन्यबलामुळे चित्तोडची ताकद कमी पडली पराभव समोर दिसू लागला. त्यावेळी राणी कुमावतीने बाबराचा मुलगा हुमायुं वाला राखी पाठवून आपले चितोडचे रक्षण करण्यास सांगितले आणि हुमायुने देखील रात्रीचा स्विकार करून जाती, धर्म याचा मुळीच विचार न करता चित्तोडचे रक्षण केले. राखीचे सामर्थ्य हे असे असते.

वैदिककाळापासून रक्षाबंधन किंवा रसमंगळ या संस्काराची प्रथा रुजू आहे. जेव्हा श्रीकृष्णाच्या करंगळीला सुदर्शन चक्राचा घाव लागला, तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीचा पदर काढून बांधला. तेव्हापासुन द्रौपदीच्या रक्षणाची जबाबदारी भगवान श्रीकृष्णावर आली. श्रीकृष्ण द्रौपदीला बहिण मानीत. जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते तेव्हा भगवान श्रीकृष्णानी तिची रक्षा
केली.

जेथे विषयांचा मान राखला जातो तेथे देवता वास करतात. भाऊ बहिणींचे प्रेम हे अत्यंत पवित्र असते. बहिणीच्या मनात आईवडीलांबद्दल आदराची भावना असते, तसेच भावाबद्दल अपार प्रेम असते. आपल्या भावाचा प्रपंच सुखाचा व्हावा म्हणून ती सतत प्रयत्न करते. भावाच्या कल्याणासाठी देवाजवळ प्रार्थना करत असते.

रक्षाबंधन म्हणजे ध्येय-रक्षण. ज्याने जीवनात काही बंधन मान्य केले आहे, जो जीवनात काही ध्येयासोबत बांधला गेलेला आहे, तोच जीवनचा विकास साधु शकतो.

By vsadmin