कोजागिरी पौर्णिमा
अश्विन महिन्यात जी पौर्णिमा येते तिला आपण कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतो. कोजागिरी पौर्णिमेचे दुसरे नाव म्हणजे शरद पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमा बऱ्याच वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. बंगाली लोक याला लोकी पूजा असे म्हणतात तर काही ठिकाणी कोमोदी पौर्णिमा असेही म्हणतात. बऱ्याच भागात ही नवरात्री पौर्णिमा म्हणूनही साजरी होते. चंद्र हे प्रेमाचे प्रतीक आहे चंद्राची रात्र म्हणजेच पौर्णिमेची रात्र सर्वांना सुख आणि आनंद देते. बरेच लोक कोजागिरी पौर्णिमेला शरदाच्या चांदण्यात भजन कीर्तन करत जागरण करतात. अश्विन महिन्यात येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव हा रात्री बारा ते साडेबारा या वेळेत करायचा असतो. या रात्री माता लक्ष्मीची पूजा केली जाते.
कोजागिरी शब्दाचा अर्थ म्हणजे कोण जागृत आहे असा विचारत माता लक्ष्मीदेवी त्या दिवशी सर्वत्र फिरत असते असं म्हणतात. नवरात्रीनंतर येणारी ही पौर्णिमा शेतीची कामही अर्ध्यावर झालेली शेतातील पीक वाऱ्यावर डोलू लागलेली चार महिन्यांचा पावसाळाही संपत आलेला काही भागात नवीन पीक हाताशी सुद्धा आलेली असं वातावरण सर्वत्र असते. या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची आश्विनी साजरी करतात. रात्री उशिरापर्यंत गप्पा गोष्टी करत रास आणि गरबा खेळत आठवणीतली गाणी गात सर्वजण जागरण करतात आणि ते मसाला दूध सर्वजण प्राशन करतात.
कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय?
आपण जाणून घेणार आहोत कोजागिरी पौर्णिमेबद्दल. कोजागिरी म्हटलं की रात्री गच्चीवर जाऊन मस्त गप्पागोष्टी करीत दूध आठवणे असे चित्र सगळ्यांसमोर उभे राहते. पण कोजागिरी पौर्णिमेचा एक विशिष्ट महत्त्व आहे. हिंदू धर्मातील कोजागिरी पौर्णिमा हा एक महत्त्वाचा सण आहे. जो आश्विन महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या रात्री चंद्र पूर्ण आणि खूप तेजस्वी असतो, ज्यामुळे आकाश सुंदर दिसतं. महाराष्ट्र, कर्नाटक, आणि पश्चिम बंगालमध्ये हा सण मोठ्या उत्साहाने साजरा होतो.
कोजागिरीच्या रात्री लोक चंद्रप्रकाशात दूध उकळून त्यात केसर, वेलची आणि साखर घालून ते प्रसाद म्हणून घेतात. असं मानलं जातं की या रात्री चंद्राच्या प्रकाशात औषधी गुण असतात, जे दूध पिणे आरोग्यासाठी चांगलं ठरतं.
“को-जागृती” या शब्दावरून या सणाला कोजागिरी असं नाव दिलं आहे. असं म्हणतात की या रात्री लक्ष्मी देवी विचारते, “कोण जागं आहे?” जे लोक जागे राहून देवीची पूजा करतात, त्यांना देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांचे जीवन सुख-समृद्धीने भरले जाते.
कोजागिरी पौर्णिमेचा धार्मिक अर्थ जरी महत्त्वाचा असला तरी, हा सण कुटुंब आणि मित्रांसह आनंदाने साजरा केला जातो. लोक एकत्र येऊन गच्चीवर किंवा अंगणात गप्पा मारतात, गाणी गातात, आणि चंद्राच्या प्रकाशात एकत्र वेळ घालवतात.
कोजागिरी पौर्णिमा कशी साजरी करतात?
कोजागिरी पौर्णिमा हा सण लोक मोठ्या उत्साहात साजरा करतात. संध्याकाळी सर्वजण स्वच्छ कपडे घालतात आणि पूजा करण्यासाठी तयार होतात. चंद्र उगवल्यावर, सगळे जण घराच्या गच्चीवर किंवा अंगणात जमतात. चंद्राच्या शीतल प्रकाशात दूध उकळलं जातं आणि त्यात केसर, वेलची, साखर घालून त्याचं प्रसाद बनवलं जातं.
या रात्री चंद्रप्रकाशात दूध पिण्याची जुनी परंपरा आहे. असं मानलं जातं की चंद्राच्या किरणांमध्ये औषधी गुण असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. कुटुंब आणि मित्रमंडळी एकत्र येऊन गप्पा मारतात, गाणी गातात, आणि एकमेकांसोबत हा आनंदाचा क्षण साजरा रतात.
या दिवशी लक्ष्मी देवीचीही पूजा केली जाते. लोकांचं असं म्हणणं आहे की, लक्ष्मी देवी या रात्री जागृत असणाऱ्यांना आशीर्वाद देते, त्यामुळे लोक जागरण करतात आणि देवीची आराधना करतात. हा सण धार्मिक असला तरी कुटुंबीय आणि मित्रांसोबत वेळ घालवण्याचं विशेष महत्त्व आहे, त्यामुळे हा दिवस आनंदाचा ठरतो.
2024 मध्ये कोजागिरी पौर्णिमा कधी आहे?
यावर्षी कोजागिरी पौर्णिमा 16 ऑक्टोबरला आहे. हा सण मुख्यतः महाराष्ट्र आणि कर्नाटकासह भारतातील विविध राज्यांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. कोजागिरीच्या दिवशी लोक चंद्रप्रकाशात दूध प्रसाद म्हणून घेतात आणि लक्ष्मी देवीची पूजा करतात.
कोजागिरी पौर्णिमेची कथा
एका गावात एक अत्यंत गरीब माणूस होता. एक दिवस त्याचे पत्नीबरोबर भांड झाले. त्यानंतर तो माणूस पैसे मिळवण्यासाठी घराबाहेर पडला. दिवसभर उपाशीपोट फिरत संध्याकाळी समुद्राच्या काठाकाठाने तो एका अरण्यात आला. तिथे त्याला तीन नागकन्या दिसल्या. त्या विचार करीत होत्या, चिंतेत होत्या, त्यांना सोंगट्या खेळण्यासाठी एका चवथ्या गड्याची गरज होती. त्या माणसाला पाहिल्यावर त्या नागकन्यांना आनंद झाला. त्यांनी त्याला खेळायला बोलाविले. दिवसभरच्या भटकंतीने तो थकला होता. नागकन्यांनी त्याला नारळाचे पाणी प्यायला दिले. त्याला बरे वाटले, त्या नागकन्यांबरोबर तोही सोंगट्या खेळायला बसला पण का कुणास ठाऊक खेळतांना तो सारखा हरत होता.
त्या दिवशी आश्वीन शुध्द पौर्णिमेची रात्र होती. सर्वत्र गार वारा सुटला होता. शुभ्र चांदणे पसरले होते. इतक्यात अक्काबाईचा फेरा आला, लक्ष्मी देवी आली, गरीबाला गरीबीमुळे दिवसभर उपवास घडलाच होता आणि खेळामुळे जागरण चालुच होते. त्याच्या हातून सहजपणे कोजागरी व्रताचे पालन झाले होते. लक्ष्मी त्या गरीबावर प्रसन्न झाली. तो गरीब खेळात जिंकु लागला. तो देखणा, उत्साही, राजबिंडा दिसु लागला. राजकन्यांनीही त्याला अमाप संपत्ती दिली. नागकन्यांबरोबर त्याचा विवाह झाला. सर्व संपत्ती आणि नागकन्यांना घेऊन तो घरी आला. तेव्हापासुन तो कोजागरीच्या व्रताचे पालन करू लागला अशीही कथा आहे.
कोजागरी पौर्णिमा म्हणजे जागृतीचा उत्सव, वैभवाचा उत्सव, आनंदाचा उत्सव, उल्हासाचा उत्सव. या दिवशी चंद्र स्वतःच्या १६ व्या कलेने फुललेला असतो. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने त्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या आधिकाधिक जवळ असतो. संपूर्ण वर्षात त्या दिवसाचा चंद्र सर्वात मोठा वाटतो. कोजागरी पौणिमेचा चंद्र अधिक आकर्षक वाटतो. चंद्राचा प्रकाश शांत व शीतलही आहे. एवढेच नाही तर तो उपयोगी व उपकारकही आहे. शेतात पडुन असलेल्या धान्याला तसेच अनेक प्रकारच्या औषधींच्या गुणांना पुष्ट करण्यात चंद्राचा फार मोठा भाग आहे. भगवान गीतेत सांगतात की..
रसात्मक सोम बनुन मी सर्व औषधींनी पुष्ट करतो ।
पुष्णामि चौषधिः सर्वाः सोमी भुत्वा रसात्मकः ॥
कोजागिरी पौर्णिमा विषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
कोजागिरी पौर्णिमा का साजरी करतात?
कोजागिरी पौर्णिमा मुख्यतः लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि चंद्राच्या प्रकाशात दूध पिण्याच्या परंपरेमुळे साजरी केली जाते. असं मानलं जातं की या दिवशी चंद्राच्या किरणांमध्ये औषधी गुण असतात.
कोजागिरी पौर्णिमेला काय करतात?
लोक चंद्रप्रकाशात दूध उकळून त्यात केसर, वेलची, आणि साखर घालून प्रसाद बनवतात. देवी लक्ष्मीची पूजा करून जागरण करतात, आणि कुटुंब आणि मित्रांसोबत गप्पा मारतात.
कोजागिरी पौर्णिमेची धार्मिक महत्त्व काय आहे?
या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि जागृत असलेल्या भक्तांना आशीर्वाद देते, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे हा सण आर्थिक समृद्धीसाठी महत्त्वाचा मानला जातो.
2024 मध्ये कोजागिरी पौर्णिमा कधी आहे?
2024 मध्ये कोजागिरी पौर्णिमा 16 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे.
कोजागिरीच्या दिवशी जागरण का करतात?
असे मानले जाते की देवी लक्ष्मी या रात्री जागणाऱ्यांना आशीर्वाद देते. त्यामुळे लोक जागरण करून देवीची पूजा करतात.